Subject:
World LanguagesAuthor:
snowflakeCreated:
1 year agoAnswer:
MajhiMarathi
Home Marathi Biography
टीम इंडियाचा सुपर हिरो कर्णधार विराट कोहली यांचा जीवनपरिचय
Virat Kohli yancha Jivan parichay
विराट कोहलीला कोण ओळखत नाही? असा एकही भारतीय आणि क्रिकेट प्रेमी शोधून देखील सापडणार नाही ज्याने विराट कोहली हे नाव ऐकलं नसेल किंवा त्याला खेळतांना पाहिलं नसेल. विराट कोहली भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू असून सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी या खेळाडूंनंतर विराट असा खेळाडू आहे ज्याने भारतीय क्रिकेट संघाला मजबुती दिली आणि आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं.
आपल्या खेळातील प्रदर्शनाने आबाल-वृद्धांच्या मनात त्याने हक्काचं स्थान निर्माण केलंय. विराटला भारतीय क्रिकेट संघाचा बेक-बोन म्हंटल्या जातं कारण तो उजव्या हाताने खेळणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर व सर्वाधिक प्रतिभावान आणि हुशार खेळाडूंपैकी एक आहे. आज विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असून शेकडो तरुणांचा स्टाईल आयकॉन देखील झाला आहे.
भारतीय क्रिकेट खेळाडू…विराट कोहली – Virat Kohli Information in Marathi
Virat Kohli Information in Marathi
Virat Kohli Information in Marathi
विराट कोहलीचा जीवन परिचय – Virat Kohli History in Marathi
नाव (Name) विराट प्रेम कोहली
जन्म (Born) 5 नोव्हेंबर 1988
जन्मस्थान (Birthplace) दिल्ली
टोपणनाव (Nickname) चिकू
आई (Mother) सरोज कोहली
वडील (Father) प्रेमजी
पत्नी (Wife) अनुष्का शर्मा (बॉलीवुड अभिनेत्री)
विराट कोहली माहिती – Virat Kohli Biography in Marathi
भारतीय क्रिकेट संघातील या दिग्गज खेळाडूचा जन्म 5 नोव्हेंबर 1988 ला दिल्ली येथील एका पंजाबी कुटुंबात झाला. वडील प्रेम कोहली हे एक क्रिमिनल लॉयर होते तर आई सरोज कोहली या गृहिणी होत्या. विराटला एक मोठा भाऊ विकास आणि मोठी बहिण भावना देखील आहेत.
विराट जेंव्हा अवघ्या तीन वर्षांचा होता अगदी तेंव्हापासून त्याच्या आवडत्या खेळांमध्ये क्रिकेट फार आवडीचा खेळ होता. तो जसा-जसा मोठा होत गेला, क्रिकेटची त्याची आवड वाढत गेली. त्याच्या वडीलांनी त्याचा क्रिकेटकडचा कल ओळखला होता, ते त्याला रोज क्रिकेट प्रशिक्षणासाठी घेऊन जात असत.
विराट कोहलीचे शिक्षण – Virat Kohli Education
विराट चे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील विशाल भारती पब्लिक स्कूल येथून झाले. शिक्षणात विराट सर्वसामान्य होता आणि त्याचे संपूर्ण लक्ष कायम क्रिकेटकडेच होतं. त्यामुळे त्याच्या वडिलांनी देखील त्याची आवड पहाता अवघ्या 9 व्या वर्षी त्याला क्रिकेट क्लबमधे पाठविण्यास सुरुवात केली.
Author:
buckoek6
Rate an answer:
0