Subject:
India LanguagesAuthor:
denzelCreated:
1 year agoAnswer:
भालचंद्र नेमाडे (जन्म-१९३८) भारतीय मराठी लेखक, उपन्यासकार, कवि, समीक्षक तथा शिक्षाविद हैं। १९६३ में केवल २५ वर्ष की आयु में प्रकाशित 'कोसला' नामक उपन्यास से उन्हें अपार सफलता मिली। सन १९९१ में उनकी टीकास्वयंवर इस कृति के लिए उन्हें साहित्य अकादमी पुरस्कार से सम्मानित किया गया। उन्हें वर्ष २०१४ का प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार दिया जाएगा।[1]श्री नेमाडे की प्रमुख कृतियों में 'कोसला' और 'हिन्दू' उपन्यास शामिल हैं। उनके साहित्य में 'देशीवाद' (स्वदेशीकरण) पर बल दिया गया है।[2] वह 60के दशक के लघु पत्रिका आंदोलन के प्रमुख हस्ताक्षर थे।
Author:
clinton1wyu
Rate an answer:
10Answer:
Explanation:
“कोसला” मुळात नेमाडेंची ओळख सुरु होते ती येथून. कोसला म्हणजे कोष ज्यात एक जीव धडपडून मोठा होण्याचा प्रयत्न करतो. १९६३ साली नेमाडेंनी वयाच्या २५ व्या वर्षी हि कादंबरी लिहली आणि अल्पवधीत ती खूप प्रसिद्ध झाली. लेखनाची साचेबंद चौकट मोडून केलेलं लेखन अप्रतिम वाटत. हि कादंबरी नेमाडेंच्या स्वतःच्या आयुष्यावर आधारित आहे. यामध्ये पांडुरंग सांगवीकर नावाचा नायक आपल्या शालेय जीवनापासून ते कॉलेज जीवन आणि त्यानंतर गावाकडील काही वर्ष हे सर्व आपल्या कादंबरीत मांडलेले आहे.
एक युवक ज्याला गावाकडील निरुत्साही वातावरण न आवडणारा त्याला त्याबद्दल वाटणारा तिटकारा, पण तरीही गावासाठी काहीतरी थोर करावं असं त्याच स्वप्न. पुढील शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज मधील. आणि त्यात बरीच केलेल्या उठाठेवी जसे कॉलेजच्या निवडणुकीत मित्राच्या सांगण्यावरून भाग घेणे, स्नेहसंमेलनात पुढाकार घेऊन पैसे अडकणे अश्या नाना प्रकारच्या गमती होतात आणि पुढे नीट अभ्यास करावा हा ध्यास.
मणी नावाची त्याची धाकटी बहीण आणि ती देवीच्या साथीने मरण पावते ह्या क्षणाबद्दल लेखकाने इतक्या तिडकीने लिहाल आहे कि आपल्याला हि त्या भावना जाणून येतात. कादंबरीवरील मुखपृष्ठ हे ह्याच भागावर आहे, हा भाग तर इतक्या सुंदरतेने लिहला आहे की जणू आपल्या समोर ह्या सर्व गोष्टी होत आहेत. आपल्याला त्या गोष्टी जाणवतात. रमी विषयच प्रेम आहे, बुंदी विषयी वाटणारी वेगळी भावना आहे हे नायकाने येथे ठळकपणे दर्शवल आहे.
प्रत्येक विषयावर आपली रोकठोक मते कोसला कादंबरीत लेखकाने मांडले आहेत. आई आणि वडील याती सवांद असो किव्हा कॉलेज मधील मित्र असो.
कॉलेज मधेच अर्थवट सोडून आल्या नंतर गावात बरीच शी थू होते ते सहन करत आणि गावातील काही मित्र आणि लोकांना पाहिल्यानंतर बदलेले विचार हे खर ह्या कोसलाच सार आहे. नक्की वाचून पहा अशी हि कादंबरी.
Author:
kyliemn4u
Rate an answer:
2