उत्तर :
★ औपचारिक पत्र लेखन :
दिनांक : 29 जानेवारी, 2022
प्रति,
मा.व्यवस्थापक,
सरस्वती प्रकाशन,
पुस्तक विक्री विभाग,
दादर पश्चिम
मुंबई - 414001.
विषय : शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणे बाबत.
मा.व्यवस्थापक महोदय,
मी ऋत्विज खुराणा, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास पत्र लिहितो की,आमच्या शाळेमधील ग्रंथालयांमध्ये काही शालेय पुस्तकांची गरज भासत आहे. ती पुस्तके आपल्याकडे उपलब्ध आहेत. ती पुस्तके आमच्या ग्रंथालयासाठी हवी आहेत.विद्यार्थ्यांसाठी काही शालेय पुस्तकं व काही मनोरंजनासाठी आवश्यक आहेत त्यांची यादी पुढील प्रमाणे आहे:
1) मराठी युवकभारती
2) हिंदी युवकभारती
3) इतिहास (11 वी )
4) भूगोल (11 वी)
5) अर्थशास्त्र (12 वी)
त्यासोबतच काही ऐतिहासिक व प्रेरणादायी पुस्तके विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी हवी आहेत
1) राऊ
2) राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
3) अग्निपंख - डॉ. ए. पी . जे अब्दुल कलाम
4) मुसाफिर - अच्युत गोडबोले
वरील सर्व पुस्तक विशेष सवलती मध्ये उपलब्ध करून द्यावी ही विनंती. या पत्रासोबत ठेव रकमेचा चेक पाठविण्यात येत आहे. तसेच उर्वरित रोख रक्कम पुस्तके मिळाल्यानंतर देण्यात येईल.
आभार सहित,
आपला विश्वासू,
ऋत्विज खुराणा.
(विद्यार्थी प्रतिनिधी)
सिम्बॉयसिस इंटरनॅशनल स्कूल,
पुणे - 411007.