स्वमत तुमच्या आवडत्या समाजसुधारक विषयी माहिती लिहा मराठी मध्ये​

Answers 1

Answer:

आपला देश भारत हे एक विशाल राष्ट्र आहे. या देशात सर्व जाती धर्माचे लोक एकजुटीने राहतात. परंतु बऱ्याचदा काही दृष्ट लोक जाती धर्मांमध्ये भांडणे लावून देशात दंगे घडवून आणतात. आपल्या देशात एकीकडे देशाला तोडण्यासाठी कार्य करणारे दृष्ट लोक आहेत तर दुसरी कडे असेही काही समाजसुधारक होऊन गेले ज्यांनी आपल्या देशाची एकता, अंखंडता टिकवण्यासाठी मोलाचे कार्य केले. या महान समाजसेवकांनी देशातील कुप्रथांना थांबवण्याचे आणि गरिबांची मनोभावे सेवा करण्याचे कार्य केले.

तसे पाहता आपल्या देशातील सर्वच समाज सुधारकांचे कार्य मोलाचे आहे परंतु माझे आवडते समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले हे आहेत. ज्योतिबा फुले हे आपल्या देशाचे एक मराठी लेखक, विचारवंत आणि थोर समाज सुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि अस्पृश्य समाजाच्या समस्या सर्वांसमोर ठेवल्या. याशिवाय महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्याबद्दल मुंबई च्या जनतेने त्यांना "महात्मा" ही पदवी बहाल केली.

महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1927 ला सातारा जिल्ह्यातील एका लहानशा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. ज्योतिबा जेव्हा नऊ महिन्याचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. जोतिबांचा विवाह तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. इ.स. 1842 मध्ये त्यांनी शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशनरी शाळेत प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख असल्याने त्यांनी पाच-सहा वर्षातच आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. ज्या काळात ज्योतिबा यांनी आपले शिक्षण केले त्या काळात देशात दलित वर्गाला शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांनाही चूल व मूल सांभाळण्यास सांगून त्यांनाही शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते.

ज्योतिबा फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या सोबत मिळून स्त्री व अस्पृश्य शिक्षणाचे कार्य सुरू केले. समाजातील स्त्रियांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी 1848 साली पुण्यातील भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. सुरुवातीचा काळात या शाळेत फक्त 3 मुलींनी प्रवेश घेतला. या शिवाय समाजाच्या भयाने शाळेत शिकवण्यासाठी देखील शिक्षक तयार नव्हते. तेव्हा ज्योतिबा यांनी आपली पत्नी सावित्रीबाई ला शिक्षित करून त्यांना शाळेत शिकवण्यासाठी तयार केले. मुलींच्या या शाळेच्या प्रथम मुख्यद्यापिका सावित्रीबाई फुले होत्या.

देशात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसल्याने समाजातील लोकांद्वारे ज्योतिबांना धमक्या मिळू लागल्या, या धमक्यांना घाबरून ज्योतीबांच्या वडिलांनी त्यांना व सावित्रीबाईंना घरातून काढून दिले. या मुळे काही काळासाठी त्यांचे स्त्री शिक्षणाचे कार्य थांबले पण लवकरच त्यांनी आपल्या कार्याला पुनः सुरुवात करत 3 नवीन विद्यालय उघडले. ज्योतीबाच्या या कार्यामुळे समाजात परिवर्तन घडून येऊ लागले. या नंतर बालविवाह, सती प्रथा, जातीवाद या सारख्या कुप्रथाच्या विरुद्ध आवाज उठू लागले. दलित व निर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्योतिबा यांनी 24 सप्टेंबर 1873 'सत्यशोधक समाज' या संस्थेची स्थापना केली.

Explanation:

If you know the answer add it here!

Can't find the answer?

Log in with Google

or

Forgot your password?

I don't have an account, and I want to Register

Choose a language and a region
How much to ban the user?
1 hour 1 day 100 years