संत तुकारामांविषयीची एखादी गोष्ट मिळवा आणि लिहा

Answers 1

Answer:

एकदा तुकोबा आपल्या आश्रमात बसले होते. एक अतिशय रागीपण कधीही कोणावर रागावत नाहीत आणि ना कोणाबद्दल उलटसुलट बोलत. आपल्या या स्वभावाचे नेमके रहस्य कोणते? असे काही प्रश्न शिष्याने तुकोबांना विचारले. तुकोबांनी त्या शिष्याला शांतपणे सांगितले की, हे पाहा, मला माझ्या रहस्यांविषयी काही माहिती नाही. पण, मला तुझ्याबद्दलच्या एका रहस्याबाबत माहिती आहे. तुकोबांच्या या उत्तराने आश्चर्यचकीत झालेला शिष्य म्हणाला की, माझे रहस्य! ते कोणते, असा प्रश्न शिष्याने तुकोबांना विचारला. तुकोबांनी एकदम शांतपणे त्याला सांगितले की, पुढील आठवड्यात तुझा मृत्यू होणार आहे.

...आणि क्रूरकर्मा बाबर गुरु नानकांना गेला शरण; नेमके काय घडले?

तुकोबांचे ऐकून शिष्याला धक्का बसला. त्याचा स्वभाव अचानक बदलला. सर्वांसोबत एकदम चांगले वागू लागला. त्याची वर्तणूक सुधारली. काहीही झाले, तरी कोणावरही तो रागावला नाही. यानंतर त्याने आपला जास्तीत जास्त वेळ ध्यानधारणा, पूजापाठ यांमध्ये व्यतीत करायला सुरुवात केली. ज्या लोकांशी तो भूतकाळात वाईट वागला होता. त्यांच्याकडे जाऊन त्या सर्वांची त्याने क्षमायाचना केली. पाहता पाहता आठवडा निघून गेला. सरतेशेवटी तुकोबांकडे आला आणि म्हणाला की, गुरुजी, माझी घटिका आता भरली आहे. मला शुभाशिर्वाद द्या. तुकोबांनी त्याला विचारले की, मला सांग, कसे गेला आठवडा. किती लोकांना आपण रागे भरलात आणि किती जणांना आपण अपशब्द बोललात? असा प्रश्न तुकोबांनी केला.

लंकापती रावणाने शनी देवांना कैद करण्याचे नेमके कारण काय? वाचा

नाही. नाही. अजिबात नाही. गेला आठवडाभर मी कोणावरही रागावलो नाही. सर्वांशी प्रेमाने वागलो. जे माझ्याकडून दुखावले गेले होते, त्यांची क्षमायाचना केली, असे उत्तर शिष्याने दिले. यावर तुकोबांनी स्मितहास्य केले आणि म्हणाले की, बरोबर. हेच तर मला माहिती आहे की, माझा मृत्यू कधीही येऊ शकते. म्हणूनच मी कधी कोणावर रागावत नाही. सर्वांशी आदराने आणि प्रेमाने वागतो. समोरची व्यक्ती रागावली, तरी त्यांना शांतपणे समजावतो. जीवनाचा महत्त्वाचा अनुभव देण्यासाठी तुकोबांनी आपल्याला मृत्यूची भीती घातली, हे शिष्याला कळून चुकले.

संबंधित बातम्या

'तुका म्हणे तुम्ही करा घटापटा'

होई होई तू वारकरी !

Guru Purnima 2022: गुरुपौर्णिमा - जाणून घेऊया मुहूर्त आणि खास महत्व

Gurupurnima 2022: छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबांच्या भेटीत घडलं? आहे ना प्रेरणादायक?

धोनीच्या नेतृत्वाशी होतेय हार्दिक पंड्याची तुलना, काय आहे यामागील मुख्य कारण

महत्वाचे लेख

Swami Samarth Teachings स्वामी समर्थ शिकवण: अहंकार प्रगतीस बाधक; निरपेक्ष भक्ती श्रेष्ठ

Swami Samarth Teachings स्वामी समर्थ शिकवण: अहंकार प्रगतीस बाधक; निरपेक्ष भक्ती श्रेष्ठ

महाराष्ट्र टाइम्सवर घ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स

Follow Us

Install

Follow Us

1.8M+

Likes

443K+एकदा तुकोबा आपल्या आश्रमात बसले होते. एक अतिशय रागीट स्वभावाचा शिष्य तुकोबांपाशी आला आणि त्यांना म्हणाला की, गुरुजी, आपल्या स्वभावात एवढे माधुर्य कसे, आपण कधीही कोणावर रागावत नाहीत आणि ना कोणाबद्दल उलटसुलट बोलत. आपल्या या स्वभावाचे नेमके रहस्य कोणते? असे काही प्रश्न शिष्याने तुकोबांना विचारले. तुकोबांनी त्या शिष्याला शांतपणे सांगितले की, हे पाहा, मला माझ्या रहस्यांविषयी काही माहिती नाही. पण, मला तुझ्याबद्दलच्या एका रहस्याबाबत माहिती आहे. तुकोबांच्या या उत्तराने आश्चर्यचकीत झालेला शिष्य म्हणाला की, माझे रहस्य! ते कोणते, असा प्रश्न शिष्याने तुकोबांना विचारला. तुकोबांनी एकदम शांतपणे त्याला सांगितले की, पुढील आठवड्यात तुझा मृत्यू होणार आहे.

Followers

59.6K+

Subscribers

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL Network

Marathi NewsAstroInspirational StoriesInspirational Story Of Sant Tukaram Who Told Secrets Of Happy Life

If you know the answer add it here!

Can't find the answer?

Log in with Google

or

Forgot your password?

I don't have an account, and I want to Register

Choose a language and a region
How much to ban the user?
1 hour 1 day 100 years