Answer:
स्वच्छतेचे महत्व
आपल्या आसपास स्वच्छता ठेवणे म्हणजे आपल्या भोवती कचरा न करणे व साफ सफाई ठेवणे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आजूबाजूला कचरा टाकणे अत्यंत वाईट सवय असून त्याने अस्वच्छता पसरते.
स्वच्छतेचा प्रश्न लक्षात ठेवून शासनाने स्वच्छ भारत अभियानास सुरवात केली आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काही गोष्टी पाळाव्या लागतात. ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवा. कचरा फक्त कचराकुंडीत टाका. पडलेला कचरा दिसला तर उचलून योग्य जागेवर टका. झाडे लावा.
स्वछता असली तर आजार पसरत नाही. परिसर सुंदर दिसते. आपण स्वछता ठेवली पाहिजे.