Subject:
HindiAuthor:
domínguez84Created:
1 year agoAnswer:
Explanation:
कुष्ठरोग हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे. याचा परिणाम त्वचा, हातातील आणि पायातील परिघवर्ती चेता , नाकाची अंतत्वचा, घसा आणि डोळ्यावर होतो. चेतांच्या टोकावर परिणाम झाल्याने परिणाम झालेल्या भागाची संवेदना नष्ट होते. संवेदना नाहिशी झाल्याने हाता पायाची बोटे वाकडी होतात किंवा गळून पडतात. हात पाय विद्रूप होणे हे या रोगात प्रामुख़्याने आढळते. कुष्ठरोगींना सरकार मार्फत सुविधा पुरवल्या जातात.
हॅन्सन या शात्रज्ञाच्या नावावरून कुष्ठरोग ओळखला जातो. 1873 साली त्याने या रोगाचा कारक “मायकोबॅक्टेरियम लेप्रि” चा शोध लावला. या जिवाणूच्या संसर्गाने त्वचेमध्ये अस्वाभाविक बदल होतात. या बदलास विकृतिस्थल म्हणतात. त्वचेवरील हे भाग वेड्यावाकड्या आकाराचे आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यांची कड गडद रंगाची आणि मध्यभाग फिकट रंगाचा दिसतो. मायकोबॅक्टेरियम लेप्रि कमी तापमानास वाढतो. त्यामुळे त्वचा, अंतत्वचा आणि चेता यामध्ये तो वाढतो. चेतामध्ये वाढल्याने चेता नष्ट होतात आणि त्या भागाची संवेदना नाहिशी होते. हातापायांच्या बोटांची संवेदना नाहिशी झाली म्हणजे त्याना इजा होण्याची शक्यता वाढते. इजा झाल्यास जखमामध्ये जिवाणू वाढतात आणि उघड्या जखमा होतात. उघड्या जखमांचे पर्यावसान गॅंग्रीनमध्ये झाल्याने उती मृत होतात. अशाने अवयव विद्रूप होतात. शरीर विद्रूप झाल्याने दोन हजार वर्षापूर्वी बायबल काळात कुष्ठरोग हा ओंगळवाणा रोग अशी त्याची ख्याती होती. बायबलच्या जुन्या काळात याचा उल्लेख आहे. या काळात कुष्ठरोगाचे रुग्ण समाजापासून वेगळे ठेवले जात. त्यांच्यासाठी वेगळ्या वस्त्या असत. अजून समाजात या रोगाबाबत हिन भावना आहे. हा रोग वेगाने पसरणारा संसर्गजन्य नाही. त्याची वाढ अत्यंत सावकाश होते. घरामधील रुग्णाचा वावर आणि कुष्ठरोग्याची तपासणी करणारा वैद्यकीय कर्मचारी यांच्यापासून तो पसरत नाही. तो पूर्णपणे बरा होतो. कुष्ठरोगावरील उपचार दीर्घ मुदतीचे आणि बहु उपचारी आहेत.
कृष्ठरोग मायकोबॅक्टेरियम लेप्रि नावाच्या जिवाणूमुळे होतो. हा जिवाणू मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलिसारखा आहे. मा. ट्युबरक्युलिमुळे क्षय होतो. हे दोन्ही जिवाणू सूक्ष्मदर्शकाखाली पाहण्यासाठी असिड फ़ास्ट विरंजक वापरावे लागते. त्यामुळे यास असिड फास्ट जिवाणू असेही म्हणतात. मायकोबॅक्टेरियम लेप्रीचा शरीरात शिरकाव झाल्याच्या दोन प्रतिक्रिया होतात. यातील ट्युबरक्युलिड लेप्री हा तुलनेने सौम्य रोग आहे. शरीराची प्रतिकार यंत्रणा ज्या ठिकाणी मा. ट्युबरक्युलिड लेप्रीचा शिरकाव झाला आहे त्या ठिकाणी त्यास अटकाव करते. त्याचा प्रसार शरीरात इतर ठिकाणी होणार नाही यासाठीची ही उपाययोजना आहे. ही यंत्रणा शरीराच्या त्वचेमध्ये खोलवर कार्य करीत असल्याने केसांची मुळे, घाम येणा-या ग्रंथी, आणि संवेदी चेता यांचा नाश होतो. परिणामी त्वचा कोरडी आणि रंगहीन बनते. त्वचा संवेदनहीन झाल्याने स्पर्शज्ञान होत नाही. चेहरा, हात आणि पायाच्या चेता आकाराने मोठ्या होतात. डॉकटराना त्या जाणवतात. चेता हातास जाणवणे हे टीटी (ट्युबरक्युलिड लेप्रसी) चे लक्षण आहे. या प्रकारात टीटी जिवाणूंची संख्या कमी असल्याने यास पॉसिबॅसिलरी लेप्रसी असेही म्हणतात. सत्तर टक्के कृष्ठरोगाचे रुग्ण या प्रकारातील आहेत.
Author:
isabellenorton
Rate an answer:
3