Answer:
सामाजिक व्यवस्था सांभाळणारा, प्रत्येक वेळी कुठल्याही संकटाच्या वेळी तत्परतेने उभा राहणारा, सतत लोकांना मदत करणारा, नैसर्गिक आपत्ती असो किंवा मानवनिर्मित आपत्ती असो प्रत्येक वेळेस धैर्याने संकटाला सामोरा जाणारा हा एकच व्यक्ती असतो आणि तो म्हणजे पोलीस. हो मी पोलीस बोलतोय, तुमच्यासारखाच सर्वसामान्य माणूस, परंतु तुमच्या सर्वसामान्यांसारखे आयुष्य नसणारा. पोलिस म्हटले तर तत्परता, कर्तव्यदक्षता, मदतनीस असे सर्व शब्द आठवतात.
पोलीस नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयारच असतो. आपले कर्तव्य पार पाडत असताना तो कधीही स्वतःचा, कुटुंबाचा विचार करत नाही. निस्वार्थी वृत्तीने तो समाजासाठी नेहमीच तयार असतो. परंतु खरच समाजात लोकांच्या मनात त्याच्याबद्दल तेवढा आधार असतो का? खरंच त्याला जेव्हा समाजाची गरज असते तेव्हा समाज त्याच्यासोबत उभा राहतो का? कहिही झाले तरी तो एक माणूस आहे हे खरंच समाज लक्षात घेतो.का?
तर त्याचे उत्तर नाही असे आहे. कारण पोलिसांना अनेक अडचणीतून जावे लागते. त्यांना कुठल्याही प्रकारचा सण आपल्या कुटुंबासोबत मनवता येत नाही. तो नेहमी समाज रक्षणासाठी तयार असतो. त्याची अपेक्षा फक्त एवढीच असते की त्याला ही लोकांनी माणूस म्हणून समजावे. त्यालाही कुटुंब असते याचेही भान ठेवावे. कितीही काहिही झाले तरी तो तुमच्यासाठी नेहमी उभा राहील कारण तो एक पोलिस आहे.
Author:
benjamin853
Rate an answer:
3