Answer:
इ.स. १८५७ च्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धात मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लहुजी राघोजी साळवे, नानासाहेब पेशवे, शेवटचा मुघल बादशाहा बहादूरशाह जफर इत्यादी स्वातंत्रवीरांचा सक्रिय सहभाग होता. मात्र स्वातंत्र्ययुद्ध अयशस्वी झाले, आणि भारतात ब्रिटिश सरकारचे शासन सुरू झाले. त्यापूर्वी आणि त्यानंतरही ज्या क्रांतिकारांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी हरप्रकारे प्रयत्न केले अशा काही क्रांतिकारकांची ही यादी:
Explanation:
अनंत लक्ष्मण कान्हेरे (जन्म : आयनी मेटे, रत्नागिरी जिल्हा, ७ जानेवारी १८९२; - ठाणे, १९ एप्रिल १९१०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. ते गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले.
राजे उमाजी नाईक ( ७ सप्टेंबर १७९१ - मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक होते.
आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक [खोमणे]
जन्म:
सप्टेंबर ७, १७९१
किल्ले पुरंदर,भिवडी, पुणे, ब्रिटिश भारत
मृत्यू:
फेब्रुवारी ३, १८३२
खडकमाळ आळी , पुणे, ब्रिटिश भारत
चळवळ:
भारतीय स्वातंत्र्यलढा
धर्म:
हिंदू (रामोशी)
वडील:
दादोजी खोमणे
आई:
लक्ष्मीबाई
चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी (जन्म : भावरा-अलिराजपूर, २३ जुलै १९०६; - अलाहाबाद, २७ फेब्रुवारी १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना भगत सिंग यांचे गुरू मानले जाते व ते एच.एस.आर.ए. संघटनेचे प्रमुख होते.
मंगल पांडे(अज्ञात - एप्रिल ८, १८५७) हे भारताच्या १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील आद्य क्रांतिकारक मानले जातात.
मंगल पांडे
मंगल पांडे यांचा मिरत(आजचे मेरठ)मधील पुतळा
जन्म:
-
नगवा, फैजाबाद जिल्हा, उत्तर प्रदेश
मृत्यू:
एप्रिल ८, १८५७
बराकपूर, कलकत्ता, पश्चिम बंगाल
चळवळ:
भारतीय स्वातंत्र्यलढा
धर्म:
हिंदू