Answer:
कथा लोकांना प्रेरणा देणाऱ्या असाव्यात, एक उत्तम कथा लोकांच्या आयुष्यातील समस्यांविषयी आणि त्यातील अनेकपदरी संकटाविषयी असते" : 52 व्या इफफी दरम्यान मास्टर क्लास मध्ये सुप्रसिद्ध पटकथा लेखक सॅब जॉन एडथाटिल यांनी मांडले मत
कथा, विश्लेषणात्मक, एकरेषीय असू शकतात, मात्र पटकथांचे तसे नसते.पटकथा केवळ प्रेक्षकांना पडद्यावर दृक्श्राव्य स्वरूपात कथा सांगण्यासाठी केलेले रेखाटन असते: एडथतील
Posted On: 26 NOV 2021 8:10PM by PIB Mumbai
पणजी, 26 नोव्हेंबर 2021
उत्तम कथा त्या असतात, ज्या आपल्याला प्रेरणा देतात, असे मत सुप्रसिद्ध पटकथालेखक सॅब जॉन एडथॅटिल यांनी व्यक्त केले. "जर कथा अशा गोष्टींविषयी असेल, ज्या आपल्याला आयुष्यात सहजसाध्य आहेत, तर ती कथा प्रेक्षकांना आकर्षित करणार नाही. कथा ही व्यक्तिरेखांच्या प्रवासाविषयी असते, त्यांच्या आयुष्यातील संघर्षांविषयी असते. उदाहरणार्थ, एखादी कथा असेल, 'मला रोझशी लग्न करायचं होतं, त्यामुळे मी रोझशी लग्न केलं." तर ती आपल्याला भावेल का? नक्कीच नाही. त्यामुळेच कथा लोकांच्या आयुष्यातील संकटांविषयी असते, त्यातल्या विविध समस्यांविषयी असते." 52 व्या इफफीदरम्यान 25 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या मास्टरक्लास मध्ये एडथॅटिल यांनी पटकथालेखन या विषयाविषयी मार्गदर्शन केले. 20 ते 28 दरम्यान गोव्यात हा मिश्र स्वरूपात हा महोत्सव होत आहे. इफफीमध्ये असलेल्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष स्वरूपात तर इतरांनी आभासी स्वरूपात https://virtual.iffigoa.org/ लिंंकवर या मास्टरक्लासचा लाभ घेतला.