Answer:
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गेट-वे ऑफ इंडिया येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गेट-वे ऑफ इंडिया येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई शहर तसेच पतंजली योग समिती व मुंबई ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा, मुंबई येथील भारत स्वाभिमानी असोशिएशन अध्यक्ष सुरेश यादव, पंतजली समितीचे अध्यक्ष पोपटराव कदम, महिला पतंजली योग समितीच्या अध्यक्षा मेधा चिपकर, सिआरपीएम, सीआयएसएफचे जवान, सिंडीकेट बँकेचे कर्मचारी, एमबीपीटीचे सदस्य, ओएनजीसीचे अधिकारी, होलीनेम हायस्कूल, सर जे जे हायस्कूल, बाईकाबीबाई हायस्कूल, सेंट ॲनीस हायस्कूल, जय हिंद कॉलेज, सेंट झेवियर्स कॉलेस, सेंट जोसेफ हायस्कूल, सर जे जे गर्लस् हायस्कूल, एलफीस्टन कॉलेज, स्कॉलर हायस्कूलचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
स्वाभिमानी असोशिएशन अध्यक्ष सुरेश यादव यांनी विद्यार्थी व उपस्थितांना योगाची विविध प्रकाराचे प्रात्यक्षिके सादर करुन दाखविली.