Answer:
Answer in brief
Explanation:
Table of Contents
- प्लास्टिक म्हणजे काय :-
- प्लास्टिक प्रदूषण म्हणजे काय :
- प्लास्टिक प्रदूषण :-
- प्लास्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम :
- प्लास्टिक कचरा व्यवस्थापन :-
- प्लास्टिक कचरावर सरकारने घेतलेले काही नियम :
हे सुद्धा देखील अवश्य वाचा :
” प्लास्टिक “ हे नाव ऐकले तरी आपल्याला चीड निर्माण होते करण वजनाने हलके, टिकाऊ असलेले हे प्लास्टिक आज प्रत्येक व्यक्तीला हवेहवेसे वाटत आहे व प्लास्टिक हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे.
प्लास्टिकचा येवढा बेसुमार वापर वाढला आहे. आपल्या देशातून दररोज सुमारे 26 हजार टन प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो. आणि यातील बहुतांश कचरा हा आपल्या रोजच्या जीवनाच्या गरजा आहेत जसे की, पाण्याच्या बॉटल, स्ट्रॉ, प्लास्टिकच्या पिशव्या, खाद्यपदार्थांची वेष्टणे यामुळे हा कचरा होतो. आणि हा कचरा आपल्याला घातक ठरू शकतो.
प्लास्टिक म्हणजे काय :-
कार्बन हा मुख्य घटक असलेला पदार्थ म्हणजे प्लास्टिक.
प्लास्टिक साधारणपणे उच्च अण्विक द्रव्य मानाचे सेंद्रिय पॉलीमर्स असतात. त्याप्रमाणेच प्लास्टिक मध्ये अनेक पदार्थ असतात आणि हे पदार्थ आपल्या पर्यावरणासाठी घातक ठरू शकतात. प्लास्टिक हे सहसा कृत्रिम पद्धतीने तयार केले जातात.तसेच पेट्रोकेमिकल्स मधून सुद्धा प्लास्टिक मिळू शकते. परंतु बहुतेक वेळा नॅनोलॉजी मटेरियल जसे की, कॉइलेंटिक ॲसिड किंवा कॉन्ट्री लिटर्स पासून सेल्युलोसिक्स यासारखे पदार्थातून प्लास्टिक ची निर्मिती होते.
प्लास्टिक प्रदूषण म्हणजे काय :
प्लास्टिक प्रदूषण म्हणजे आपण आज काल नदी नाल्या किंवा समुद्र किनाऱ्यावर जे लोक प्लास्टिकचा वापर करून ते प्लास्टिकचा कचरा, कचरा पेटी मध्ये न टाकता ते इतर ठिकाणी टाकत असतात.
त्यामुळे जागोजागी आपल्याला प्लास्टिकचे भाग रस्त्यावर खाली पडलेली दिसतात. तसेच तेच प्लास्टिक नदी नाल्यांमध्ये सुद्धा काही जण प्लास्टिकचा वापर करून तसेच त्या नदी नाल्यांमध्ये सोडून देतात. त्यामुळे आजकाल प्लास्टिक प्रदूषण खूप वाढलेला आहे. तर मित्रांनो यालाच म्हणतात प्लास्टिक प्रदूषण.
प्लास्टिक प्रदूषण :-
प्लास्टिकचा वापर आज खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणासाठी प्लास्टिकचा वापर होतोच. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण प्लास्टिक खूप मोठ्या प्रमाणात वापरतो.शास्त्रज्ञांनी न गंजणारी, वजनाने फार हलकी अशी आणि टिकाऊ वस्तू बनवली ती म्हणजेच प्लास्टिक.
प्लास्टिक सारखा पदार्थ बनविला खरा पण रोजच्या जीवनात प्लास्टिक मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले. प्लास्टिक असा पदार्थ आहे तो लवकर नष्ट होत नाही प्लास्टिकला नष्ट होण्यासाठी साधारणतः 400 ते 500 वर्षांचा काळ लागतो.त्यामुळे अलीकडे प्लास्टिकच्या प्रदूषणाने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. एकदा वापरात आणलेले प्लास्टिक पुन्हा वापरता येत नसल्याने प्लास्टिकचे पदार्थ टाकायचे कुठे आणि त्याची विल्हेवाट लावायची कशी हा प्रश्न संपूर्ण जगाला पडला आहे.
आपल्या इथे आढळणाऱ्या घन कचऱ्यामध्ये 5 ते 6 टक्के कचरा हा प्लास्टिकचा कचरा असतो. केंद्रीय वन, पर्यावरण व वातावरण बदल मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार देशामध्ये सुमारे 65 दशलक्ष टन येवढा घनकचरा दरवर्षी तयार होतो.व त्यापैकी 5.6 दशलक्ष टन कचरा हा प्लास्टिकचा असतो. तर यापैकी महाराष्ट्र राज्यातून 5 लक्ष टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो.
यावरून आपल्याला कळते कि ही प्लास्टिक ने आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात ग्रासले आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक प्लास्टिकचा कचरा एकट्या मुंबई मधून निर्माण होतो.आणि याचा परिणाम मुंबई वर असा झाला की, मुंबईतून वाहणाऱ्या मीठा नदीमध्ये प्लास्टिकचे प्रमाण वाढून, नदीचे पात्र तुंबले व परिणामी पावसाळ्यामध्ये नदी नाल्याचे पाणी नदीला जाऊन नदीच्या पाण्यात वाढ झाली. व शेवटी नदीला पूर येऊन नदीचे पाणी संपूर्ण मुंबई शहरा मध्ये गेले.
दिवसें दिवस वाढत जाणाऱ्या या प्लॅस्टिकच्या प्रदूषणा मुळे आपल्या देशावर आणि देशातील जनतेवर त्याचे परिणाम दिसून येत आहेत.
प्लास्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम :
दिवसें दिवस वाढत जाणाऱ्या प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर त्याचे गंभीर दुष्परिणाम होताना दिसून येत आहेत. आपल्या आसपास प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होते तो म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यां मार्फत प्लास्टिकच्या पिशव्यांचे विघटन होण्यासाठी सुमारे 400 ते 500 वर्षे लागतात. आणि ह्या पिशव्या इतरत्र फेकल्या मुळे जमिनीची धूप होते, जमीन नापीक होते.
– तसेच प्लास्टिकचा आणखी एक मोठा वापर होतो तो म्हणजे पाणी – पिण्याच्या बाटल्या. पाणी पिऊन इतरत्र कुठेही बाटल्या फेकल्या जातात व ते प्लास्टिक पिशव्या गाय वगैरे प्राणी खातात.
प्लास्टिक मधील घटक नष्ट होत नाही आणि प्लास्टिक ही नष्ट होत नाही. ते प्राण्यांच्या पोटात तसेच अडकते त्यामुळे प्राण्यांची जीवन धोक्यात येते.