Subject:
CBSE BOARD XIIAuthor:
shaggyCreated:
1 year agoExplanation:
या वर्षी मे महिनाच्या सुट्टीत मी गावी गेलो होतो . आणी त्यामुळेच मला आयती शेतकऱ्याची मुलाखत घेता आली . पण ही मुलाखत होती कोकणातील शेतकऱ्याची . माझ्या आईचे मामा शेतकरी असल्यामुळे मला सहजपणे मुलाखतीसाठी वेळ मिळाली. त्या शेतकऱ्याने मला जे काही सांगितले तो माझ्यासाठीचा एक उत्कृष्ट अनुभव ठरला . या मुलाखतीची सुरवात त्यांच्या नावाने झाली . आणि जवजवळ ४५ वर्षांचा दांडगा अनुभव माझ्यासोबत शेअर केला . त्या शेतकऱ्याचे नाव अनंत दत्ताराम एकावडे . १९७५ साली त्यांनी आपले १२ वी चे शिक्षण पूर्ण केले . त्यानंतर मात्र घराच्या हलाखीच्या परिस्तिथी मुळे शेतीकडे वळायला लागले . त्यांचे इतर मित्र चांगल्या नोकरीवर लागले आणि आपण मात्र शेतकरी बनून राहिलो या गोष्टीचे त्यांना वाईट वाटते . ते म्हणतात शेती व्यवसायात गुंतुवणूक आणि भविष्यात त्यापासून किती नफा मिळेल याचा अंदाअ आपल्याला घ्यावा लागतो . हा दृष्टीकोन काही शेतकऱ्यांकडे नसतो ,त्यामुळे ते आत्महत्या करतात .त्याचप्रमाणे विदर्भातील शेतीची जमीन आणि कोकणातील शेतजमीन यातील विदर्भातील जमीन ही शेतीसाठी अधिक सुपीक आहे . त्यामुळे विदर्भातील शेतकरी पूर्णपणे शेतीव्यवसायावर अवलंबून असतात ,तर कोकणातील शेतकऱ्याना उदरनिर्वाहासाठी शेतीसोबत पूरक व्यवसाय करावा लागतो . आपल्या अनुभवातून सर्व गोष्टी ते शिकले . ते म्हणतात आपल्याला दुसऱ्यांना पाहून स्व;वर त्या गोष्टींचा प्रयोग किंवा अनुकरण करावे लागते . हाच प्रयोग त्यांनी शेतीवर केला . ते म्हणतात आम्ही गावातील शेतकऱ्यांनी शेत कापण्यासाठी, कामगारांचा खर्च वाचवण्यासाठी एक युक्ती केली आहे . आम्ही गावातील १०-१२ शेतकऱ्यांनी मिळून एक संघ तयार केला आहे . आणि आम्ही प्रत्येकजण कापणीच्या वेळी एका -एका शेतकऱ्याच्या घरी जातो ,यामुळे कापणीचा खर्च वाचतो. . ते म्हणतात सरकारी योजना पूर्णपणे आमच्यापर्यंत पोहचत नाही ,सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत फार कमी प्रमाणात आमच्यापर्यंत पोहचते . सर्व शेतकर्यांना एवढच सांगू इच्छितात की रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात करावा ,त्याएवजी पारंपारिक खतांचा वापर अधिक प्रमाणात करावा ,त्यामुळे शेतीसाठी फायदा होतो
Author:
thordtuq
Rate an answer:
9शेतकरी महिलेची मुलाखत घ्या. मुलाखत लेखन-
Author:
britneystafford
Rate an answer:
7